अमरावती येथे अवयवदान व प्रत्यारोपण विषयक ‘हब अँड स्पोक मॉडेल’ कार्यशाळा संपन्न.

 

अमरावती: राज्यातील मरणोत्तर अवयव दान वाढावे या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने सुरू केलेल्या hub and spoke model अंतर्गत अवयवदान व प्रत्यारोपण संदर्भात एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे दिनांक 18 जून 2026 रोजी अमरावती येथे आयोजन करण्यात आले.

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती आणि उसंचालक कार्यालय अकोला मंडळ, अकोला व झेड.टी.सी.सी .(ZTCC), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्षेत्रातील ‘हब अँड स्पोक मॉडेल’ अंतर्गत सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यशाळेस अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील शासकीय व खासगी रुग्णालयांमधील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्याठिकाणी अवयव प्रत्यारोपण होत नाही परंतु मृत्यू पश्चात अवयव दान होऊ शकते अशा सर्व शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांनी NTORC मध्ये नोंदणी केल्यास अवयव मिळावे यासाठी प्रतीक्षा यादी मधे असणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना मदत होइल असे डॉ.सचिन जाधव ,विशेष कार्य अधिकारी यांनी सांगितले.

ह्या कार्यशाळेत विविध तज्ञांनी NTORC नोंदणी, ब्रेन स्टेम डेथ, मृत्यू पश्चात अवयव दान, या मध्ये हब अँड स्पोक कसे काम करते या विषयी माहिती दिली.तसेच T H O T A कायदा , अवयव दानासाठी रुग्णालयाची तयारी व परवानगी याविषयी सविस्तर माहिती, रुग्णाच्या नातेवाईकांशी समुपदेशन कसे करावे याविषयी माहिती, मेंदू मृत रुग्ण कसा ओळखावा व त्यासाठी कोणती टीम आवश्यक असते त्याविषयी संपूर्ण माहिती या एक दिवसीय कार्यशाळेत देण्यात आली. या कार्यशाळेत अवयवदान व प्रत्यारोपण प्रक्रियेतील विविध पैलू, अवयवदानाचे महत्त्व, समन्वय प्रक्रिया तसेच ‘हब अँड स्पोक मॉडेल’ची प्रभावी अंमलबजावणी याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

सदर कार्यक्रमास मा.आरोग्यमंत्री, मुंबई यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सचिन जाधव , डॉ. सुशील वाकचौरे (उपसंचालक, अकोला मंडळ, अकोला), डॉ. रंगतुषार वारे (ADHS) अकोला, डॉ. विनोद पवार (जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती), डॉ. शैलेश गहूकर (जनरल सेक्रेटरी, ZTCC नागपूर), डॉ. अमोल बावणे (जॉइंट सेक्रेटरी, ZTCC नागपूर), दिनेश मंडपे ( ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर ZTCC नागपूर) डॉ. अविनाश चौधरी (नेफरोलॉजिस्ट), डॉ. सिकंदर अडवाणी (न्यूरोलॉजिस्ट), श्रीमती शालिनी पाटील (ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर, नागपूर), सरिता सिरसाट (PHN) ,श्रीमती सोनाली देशमुख (राज्य अवयवदान समन्वयक) यांनी मार्गदर्शन केले.
तसेच अमरावती विभागातील पाच (अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम) जिल्ह्यांचे जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी उपस्थित राहून विविध विषयांवर मार्गदर्शन केले. जसे की,
या कार्यशाळेचे आयोजन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. माधव ढोपरे, डॉ. विक्रांत कुळमेथे, डॉ. उज्वला मोहोड, डॉ. सोनाली चौधरी, मीनल कानसे, डॉ.पायल रोकडे, डॉ.दिव्यांनी मुंदाणे यांनी विशेष परिश्रम घेतले. समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय )शितल बोंडे व ऋषिकेश धस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.तसेच रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी अजित कुलकर्णी, कार्यालय अधीक्षक विजय गाडे, अधिसेविका चंदा खोडके, ऋषिकेश सुकळकर आणि अजिंक्य डवाळे, कल्याणी गाढवे , भूपेंद्र जेवढे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यशाळेचा समारोप उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनपर संदेशांनी उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

आणखी वाचा