Neeraj Chopra : ‘किंग इज बॅक!’…२७४ दिवसांनंतर मैदानात उतरलेल्या नीरजची दमदार कामगिरी

भारतीय स्टार भालाफेकपटू आणि दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राने (Neeraj Chopra) दुखापतीतून पूर्णपणे सावरल्यानंतर दमदार कामगिरी केली आहे. दोहा डायमंड लीगमध्ये आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ८२.७७ मीटर भाला फेकून, ८२.६१ मीटरचा पात्रता निकष पार केले. यासह त्याने राष्ट्रकुल खेळ २०२६ ( Commonwealth Games 2026) मध्ये आपले स्थान निश्चित केले. त्याचा पहिला प्रयत्न फाऊल झाला होता, पण त्याने आपला दुसरा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला. यासह , तो दोहा डायमंड लीग २०२६ मध्ये चौथ्या स्थानावर राहिला. नीरजने या स्पर्धेत ८५.६९ मीटरचा सर्वोत्तम भालाफेक केला. Ind vs Eng ODI Series: टीम इंडियाला मोठा धक्का! Hardik Pandya इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, विराट कोहलीच्या फिटनेसवरही मोठी अपडेट नीरज चोप्रा CWC 2026 साठी क्वालिफाय पाठीच्या दुखापतीमुळे नीरज चोप्रा गेल्या वर्षभरापासून कोणत्याही स्पर्धेत सहभागी होत नव्हता. या दुखापतीतून सावरल्यानंतर तो २५ मे पासून स्वित्झर्लंडमध्ये सराव करत होता. नीरज चोप्राने अगदी शेवटच्या क्षणी दोहा डायमंड लीगमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. या स्पर्धेत नीरज चोप्राची स्पर्धेची सुरुवात खराब झाली, त्याने पहिल्याच प्रयत्नात फाऊल केला. त्यानंतर त्याने दुसऱ्या फेरीत ८२.७७ मीटरचा थ्रो करून आपली पहिली वैध नोंद केली. त्याची सर्वोत्तम कामगिरी तिसऱ्या फेरीत झाली, जेव्हा त्याने ८५.६९ मीटरचा थ्रो केला, ज्यामुळे तो काही काळासाठी तिसऱ्या स्थानावर पोहोचला. त्याने चौथ्या फेरीत ८३.४५ मीटरचे अंतर गाठले, परंतु अव्वल तीनमध्ये परतण्याचा प्रयत्न करताना पाचव्या फेरीत पुन्हा फाऊल केला. यामुळे डायमंड लीगमधील त्याचा प्रवास संपुष्टात आला. जाहिरात गेल्या वर्षी याच मैदानावर नीरजने स्वतः त्याच्या कारकिर्दीतील एकमेव ९० मीटरपेक्षा जास्त अंतराचा थ्रो नोंदवला होता. मात्र, यावेळी परिस्थिती वेगळी होती आणि अगदी सर्वात निष्णात खेळाडूंनाही आपला लय साधण्यासाठी संघर्ष करावा लागला. स्पर्धेच्या चौथ्या फेरीत श्रीलंकेचा खेळाडू, रुमेश थरंगा पाथिरागे याने ८८.६८ मीटरच्या शानदार थ्रोसह प्रथम स्थान पटकावले. पीटर्सने दुसरे स्थान पटकावले या स्पर्धेत, श्रीलंकेच्या पाथिरागेनंतर, विद्यमान विश्व चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेता अँडरसन पीटर्स (८६.३८ मीटर) दुसऱ्या स्थानी आला. दरम्यान, विश्व चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेता कर्टिस थॉम्पसनने ८५.९९ मीटरच्या थ्रोसह तिसरे स्थान पटकावले. स्पर्धेच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले, ज्यात पहिल्या फेरीत थॉम्पसन आघाडीवर होता आणि दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत अँडरसन पीटर्स होता, पण चौथ्या फेरीत पाथिरागेने सर्वात लांब अंतर मोजून विजय मिळवला

आणखी वाचा