
अमरावती : चिखलदरा हे विदर्भातील प्रमुख पर्यटनस्थळ असून पावसाळयात मोठया संखेने पर्यटक येथे भेट देतात. पर्यटकांचा प्रवास सुरक्षित, आनंददायी व सुरळीत व्हावा यासाठी मा. श्री निकेतन कदम, पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण हयांचे मार्गदर्शनाखाली अमरावती ग्रामीण पोलीस दलाने व्यापक नियोजन करून विशेष बंदोबस्त तैनात केला आहे.
यावर्षीच्या पावसाळी पर्यटन हंगामात सुमारे २०० पोलीस अधीकारी व अंमलदार व १०० होमगार्ड विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. पर्यटनस्थळे, वीव्ह पॉईन्ट, मुख्य रस्ते, गर्दीची ठिकाणे, पार्किंग व्यवस्था तसेच वाहतुक नियमन यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
पर्यटकांना तात्काळ मदत, मार्गदर्शन व जनजागृती करण्यासाठी १४ पोलीस मोटरसायकल रायर्डसंना बॉडी वोर्न कॅमेरा ( Body Worn Cameras) तसेच सार्वजनिक सुचना प्रणाली (Public Address System) देण्यात आली आहे. सदरच १४ पोलीस मोटरसायकल रायडर्स सतत गस्त घालून वाहतूक नियंत्रण, पर्यटकांना मार्गदर्शन तसेच आपत्कालीन परिस्थीतीत त्वरीत प्रतिसाद देईल.

मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्यांविरूध्द कठोर कार्यवाही करण्यासाठी (Drunk & Drive) तपासणी नाके विविध ठिकाणी उभारण्यात आले असून वाहन चालकांची नियमीत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच दारू पिऊन वाहने चालकिवणारे चालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तसेच वेगमर्यादेचे उल्लंघन, धोकादायक वाहन चालविणारे, ट्रिपलशीट, हेल्मेट व सीटबेल्ट नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
याशिवाय गर्दीचे ठिकाणी चोरी, पाकिटमारी, महिलांशी गैरवर्तन, बेकायदेशीर धंदे, तसेच पर्यटकांची फसवणूक रोखण्यासाठी विशेष पथके व दामीनी पथके व साध्या वेशातील पोलीस पथके संवेदनशील कार्यरत करण्यात आली आहेत. सर्व पोलीस अधीकारी व कर्मचारी हयांना पर्यटकांशी नम्र, व मदतशील वर्तन करण्याच्या निर्देश देण्यात आलेले आहेत.







